श्री गणेशाय नमः प्रल्हाद म्हणाले - प्रभो, बलीला हे ऐश्वर्यपूर्ण इंद्रपद आपणच दिले होते आणि आज आपणच ते काढून घेतले, हेच चांगले झाले. ही आपण याच्यावर फार मोठी कृपा केलीत, असेच मला वाटते. आत्म्याला मोहित करणाऱ्या राज्यलक्ष्मीला आपण याच्यापासून दूर केलेत. लक्ष्मीच्या मदाने विद्वान पुरुषसुद्धा मोहित होतात. ती असेपर्यंत आपल्या खऱ्या स्वरूपाला चांगल्या तऱ्हेने कोण जाणू शकेल ? सर्व जगाचे ईश्वर आणि सर्वांचे साक्षी अशा आपणाला- श्रीनारायणदेवांना मी नमस्कार करतो.
श्रीशुक म्हणतात - राजा, प्रल्हाद हात जोडून उभे होते. त्यांच्या देखतच ब्रह्मदेव भगवानांना काही सांगू इच्छित होते. हे राजा, इतक्यात बलीच्या साध्वी पत्नी विंध्यावलीने आपल्या पतीला बांधलेले पाहून, भयभीत होऊन, भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला आणि हात जोडून जमीनीकडे पाहात ती भगवंतांना म्हणाली.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा