।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
२४ जानेवारी २०२२
श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बाविसावा भाग - ४
श्री गणेशाय नमः ब्रह्मदेव म्हणाले - समस्त प्राण्यांना जीवन देणारे, त्यांचे स्वामी आणि जगत्स्वरूप देवाधिदेवा, आता आपण याला सोडून द्यावे. आपण याचे सर्वस्व हरण केले आहे. म्हणून आता ह्याला बांधणे योग्य नाही. याने आपली सगळी भूमी आणि पुण्यकर्माने मिळवलेले स्वर्ग इत्यादी लोक, आपले सर्वस्व तसेच आत्मासुद्धा आपल्याला समर्पित केला आहे. शिवाय, असे करतेवेळी याची बुद्धी स्थिर राहिली. प्रभो, जो मनुष्य कृपणता सोडून शुद्ध अंतःकरणाने आपल्या चरणांना पाण्याने अर्ध्य देतो आणि फक्त दुर्वादलानेसुद्धा आपली खरीखुरी पूजा करतो, त्यालासुद्धा उत्तम गती प्राप्त होते. असे असता बलीने तर मोठ्या प्रसन्नतेने, धैर्याने आणि स्थिरतापूर्वक आपल्याला तिन्ही लोकांचे दान केले आहे. मग ह्याला दुःख का व्हावे ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा
श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...
-
श्री गणेशाय नमः यावेळी एक मोठी अद्भुत घटना घडली. अनंत भगवंतांचे ते त्रिगुनात्मक वामनरूप मोठे होऊ लागले. ते एवढे मोठे झाले की, पृथ्वी, आकाश,...
-
श्री गणेशाय नमः नारद म्हणतात - वानप्रस्थाश्रम स्वीकारलेल्या पुरुषांमध्ये जर ब्रह्मविचार करण्याचे सामर्थ्य असेल, तर शरीराव्यतिरिक्त इतर सर्व ...
-
श्री गणेशाय नमः युधिष्ठिराने विचारले - हे देवर्षी, माझ्यासारखा ग्रहाशक्त माणूस सहजपने कोणत्या साधनेने हे पद प्राप्त करू शकेल ? ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा